मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चां दरम्यान एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री नितू कपूर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नितू कपूर  'सावन में लग गई आग' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 


व्हिडीओवर युझर्स अनेक कमेंट देखील करत आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, 'तुम्ही किती छान डान्स करता...', तर दुसऱ्या युझरने, 'आलिया आणि रणबीरच्या लग्नात देखील असाचं डान्स करा....' अशी कमेंट केली आहे.