मुंबई : 'उडता पंजाब', 'राझी', 'गंगूबाई काठियावाडी', 'डार्लिंगस्' अशा एकापेक्षा एक सिनेमांतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) सध्या विक्रमावर विक्रम रचताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. आलियाने काही दिवसांपूर्वी सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. प्रेग्नेंट असूनही आलिया कामालाही तितकच महत्त्व देताना दिसत आहे. (alia bhatt baby bump)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच आलिया एक पुरस्कार सोहळ्यासाठी सिंगापूरला गेली होती. यावेळी अभिनेत्रीला खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी सर्वांचं आणि देशाचे आभार मानत आलियाने भावना व्यक्त केल्या. (Alia Bhatt baby kicked her )



आलिया म्हणाली, 'गेल्या 10 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. मला उत्तम अभिनेत्री व्हायचं होतं. मी किती हुशार, गुणवान आणि मेहनती आहे, हे एक दिवस सगळ्यांना कळेल, अशी माझी भावना असायची. मी या पुरस्कार सोहळ्यात माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करत आहे, याचा मला अभिमान आहे.' (Alia Bhatt new photo video)


पुढे आलिया म्हणाली, 'माझ्या यशस्वी करियरमागे माझ्या देशाचा महत्त्वाचा वाटा आहे. या पुरस्कारामुळे फक्त माझ्यावर नाही तर, माझ्या बाळावरही सकारात्मक परिणाम होत आहे. यावेळी भावना व्यक्त करत असताना माझ्या पोटात बाळ लाथ मारत होतं' असं देखील आलिया यावेळी म्हणाली.