`एक डिसलाईक तुमचं महत्त्व कमी करू शकत नाही`
अशाप्रकारे अभिनेत्री आलिया भट्टने व्यक्त केला संताप.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली होती. घराणेशाही, गटबाजी त्यानंतर ड्रग्स प्रकरणामुळे अनेक बड्या कलाकारांने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर नेपो किड म्हणून ओळख झालेल्या अभिनेत्री आलिया भट्टवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यात संपलं नाही, तर तिच्या चित्रपटाला चाहत्यांनी विरोध दर्शवला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला 'सडक २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर ट्रोलर्सकडून देखील या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र शिवाय असंख्य डिसलाईकचा सामना चित्रपटाला करावा लागला.
वारंवार सोशल मीडियवर ट्रोल होणाऱ्या आलिया इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने समस्त चाहत्यांचे आभार मानले आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या ५० मिलियनच्या घरात पोहोचली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. 'आज कौतुकाचा दिवस आहे. त्यामुळे माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे आभार मानते ज्यांच्यामुळे माझ्या चाहत्यांची संख्या ५० मिलियनवर पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये मी फार काही शिकली आहे. सोशल मीडिया आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. आपल्याला उत्साहित ठेवतो. पण त्यामध्ये आपण कोठेच नसतो. '
आपल्या आयुष्यात नात्यांचे महत्त्व फार आहे. पण यामध्ये स्वतःला ओळखणं, स्वतःवर प्रेम करणं तितकच महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर एक लाईक किंवा डियलाईकचं बटण दाबलं की आपलं महत्त्व कमी होत नासल्याचं ती म्हणाली.