मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी गोंडस परीचं आगमन झालं आहे. त्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 6 नोव्हेंबरला आलियाला कन्यारत्न झाल्यावर सोशल मीडियावर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. आलिया-रणबीरच्या चाहत्यांमध्ये आता कपूर कुटुंबाच्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर-आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे, मात्र रणबीर-आलियाने त्याच्या चिमुकलीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जो ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो.  रणबीर-आलिया त्यांच्या मुलीबद्दल खूप संरक्षणात्मक आहेत. रणबीर आणि आलिया यांनी सेलेब्स त्याचबरोबर पाहुणे देखील त्यांच्या बाळाला भेटायला येऊ शकत नाहीत.


आलिया-रणबीरने मुलीसाठी काही नियम केले आहेत
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या मुलीच्या जन्मापासून, ती जितके उत्साही आहेत तितकेच ते तिच्याबाबतीत खूप सुरक्षित आहेत. आलिया आणि रणबीरनेही मुलीसाठी काही नियम बनवले आहेत. सध्या कोणताही पाहुणा किंवा सेलिब्रिटी त्यांना भेटायला येऊ नये असं वाटतं.


बाळाचे कोणतेही फोटो क्लिक करु नयेत असं कुटुंबीयांचं मत आहे. जर कोणत्याही मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर तो व्हायरल होईल. आलिया-रणबीरला त्यांच्या बाळाचे फोटो सध्या व्हायरल होऊ द्यायचे नाहीयेत.


मुलीला संसर्गापासून दूर ठेवायचं आहे
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर बाळाला सर्वांपासून दूर ठेवू इच्छितात जेणेकरून तिला कोणताही संसर्ग होऊ नये. बाळ अजून लहान आहे, अशा परिस्थितीत तिला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. तसंच, आम्ही घरी येणाऱ्या पाहुण्याकडून कोविड प्रमाणपत्र मागू शकत नाही परंतु व्हायरस अजूनही आपल्यामध्ये आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा करण जोहरही लंडनहून परतला तेव्हा त्याने सर्वप्रथम त्याची कोविड टेस्ट केली, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच तो आलिया भट्ट आणि बाळाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.