मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा चित्रपट ५ ऑगस्टला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत विजय वर्मा आणि शेफाली शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तिच्या 'डार्लिंग्स' चित्रपटातील 'ला इलाज' हे नवं गाणं नुकतच रिलीज झालं आहे. दरम्यान, आलिया भट्टने स्वतःच्या ट्रोलिंगबद्दल आणि चित्रपटांच्या फ्लॉप होण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्टला ट्रोलिंचा फरक पडत नाही
आलिया भट्ट एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर उघडपणे बोलली आहे. ट्रोलिंगवर आपलं मत मांडताना आलिया भट्ट म्हणाली, 'मला आता ट्रोलिंगची फारशी पर्वा नाही. किती लोकं ट्रोल करतात? मला वाटतं की आपण ट्रोलर्सला खूप महत्त्व देतो. अशा प्रकारे आलिया भट्टने स्पष्ट केलं आहे की ती ट्रोलला गांभीर्याने घेत नाही.


आलिया भट्टने सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर केलं वक्तव्य 
चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर किती परिणाम होतो किंवा नाही, असा प्रश्न आलिया भट्टला विचारण्यात आला आहे. यावर आलिया भट्टने उत्तर दिलं की, 'चित्रपटांच्या कामगिरीचा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे परिणाम होतो. आम्ही चित्रपटासाठी खूप मेहनत करतो आणि वाटतं की चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा वाईटही वाटतं.