मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभियाने अनेकांच्या मनात घर केलं आहे. आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाने तर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 'राझी', 'गली बॉय', '2 स्टेट्स', 'उडता पंजाब' यांसरख्या एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आता आलिया हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया वंडर वुमन गॅल गॅडॉटसोबत काम करणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' असे सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं दिग्दर्शन टॉम हार्परने केले आहे. आलियाचा हॉलिवूड सिनेमा लवकरचं नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.



ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी आलिया भट्टच्या हॉलिवूड पदार्पणाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. लवकरचं सिनेना नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.'


आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर,  ती लवकरच रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. याशिवाय आलिया एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर', आणि  राणीची रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे.


एकंदर आलियाकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. 'ब्रह्मास्त्र',  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमांतर आलिया अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत जी ले जरा आणि डार्लिंगमध्ये दिसणार आहे.