Alia Bhatt चं असं रूप, लग्नाच्या चर्चां रंगत असताना अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ व्हायरल
अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नाच्या चर्चा रंगत असताना आलियाचा जुना व्हिडीओसमोर येताचं चाहते थक्क...
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक एकापेक्षा एक सिनेमे देत आलिया चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या घायाळ अदांनी चाहत्यांना 'क्लिनबोल्ड' करणारी आलिया लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहे. एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूर लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
लग्नाची चर्चा रंगत असताना आलियाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आलिया फार लहान दिसत आहे. हा व्हिडीओ आहे आलियाच्या पहिल्या ऑडिशनचा.
व्हिडीओमध्ये सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिग्दर्शक करण जोहर आलियांच कौतुक करताना दिसत आहे. ऑडिशन देत असताना आलिया 'बहारा बहारा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आलियाच्या 'स्टूडेंट ऑफ द इयर' सिनेमाच्या ऑडिशनचा आहे. शिवाय आलियाने 'वेक अप सिड' सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं.
पण सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कोंकणा सेन यांची वर्णी लागली. आलियाचा ऑडिशन व्हिडीओ धर्मा प्रोडक्शनने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. आज आलिया भट्टची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत केली जाते