Alia Bhatt pregnancy : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झालं.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. 


महत्त्वाचं म्हणजे यावेळी आलियासोबत पती आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) देखील होता. आलिया डिलीव्हरीसाठी (Alia Bhatt delivery) रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते आनंदात होते.


त्यानंतर आलियाने चाहत्यांना 'गुडन्यूज' (good news) दिली आहे. आता आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत.  (alia bhatt first post after giving birth to baby girl )


आलिया मुलगी झाल्याची बातमी विरळ भयानीने(viral bhaiyani)  इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली. पण अद्याप कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


त्यामुळे अभिनेत्री नीतू भट्ट, सोनी राजदान सोशल मीडियावर काय पोस्ट करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


आलियाने केली पहिली पोस्ट 


आई झाल्यानंतर आलीय भटने एक खास पोस्ट केली आहे. एक खास फोटो पोस्ट करत आलियाने आपल्याला मुलगी झाल्याचं चाहत्यांना कळवलं आहे. (alia bhatt first post after giving birth to baby girl )


सिंहाच्या फॅमिली चा एक फोटो पोस्ट करून त्यावर लिहिलं आहे '' आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी आमची मुलगी आली..आणि ती फार अलौकिक आहे.. आम्ही दोघेही आई बाबा झालोय आणि अतिशय आनंदी आहोत'' .. 


आलियाच्या या पोस्टवर सध्या सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागलं आहे.