मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या 'गंगूबाई' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा चित्रपट लोकांना खूप आवडतो आहे. आलिया भट्टने या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामुळे तिची खूपच चर्चा होत आहे. पण एवढ्या मेहनतीनंतर आता आलिया पार्टीच्या मूडमध्ये आहे आणि ती  मनसोक्त जंक फूड खाताना दिसत आहे.


बॉलीवूडची बबली अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या हसऱ्या आणि निरागस चेहऱ्याने सगळ्यांचचं लक्षवेधून घेते. सध्या आलिया तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या सुपरहिट चित्रपटाचं सक्सेस साजरा करत आहे.


आलियाने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याला पाहून चाहते म्हणत आहेत की सुंदर मुलगी...


खरं तर, आलिया भट्ट या फोटोमध्ये खूपच निरागस दिसत आहे आणि आनंदाने बर्गर खाण्याचा आनंद घेत आहे. आलिया भट्टने फोटोसोबत लिहिले, 'गंगूबाईला सेंच्युरी बाबत शुभेच्छा आणि हॅपी बर्गर प्लस फ्राईज, तेही आलियासोबत... इतके प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.' 


आलियाच्या या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. हॉटेलमध्ये आलिया बर्गर पाहून तुडून पडली आहे.



सिनेमा करत असताना कलाकारांना आपल्या फिटनेसची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना हव्या त्या गोष्टी खाता येत नाहीत. त्यामुळे सिनेमा रिलीजनंतर आलिया आपली इच्छा पुर्ण करताना दिसत आहे.