मुंबई : अभिनेत्री आलिया (Alia Bhatt)ने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतचं चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. आलियाने आनंदाची बातमी दिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा रंगाताना दिसतात. आता देखील आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाचा हा व्हिडीओ खुद्द आई सोनी राजदानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये आलिया आणि आई दिसत आहे. सोनी राजदान यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये अभिनय करत आपल्या कर्तुत्वाची छाप उटवली. आईच्या पावलावर पाऊल ठेवत आलिया देखील यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. 



आलिया भट्टने 27 जून रोजी प्रेग्नेंसीची घोषणा केली. या घोषणेनंतर सोनी राझदान यांनी सोशल मीडियावर आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा फोटो शेअर करून त्याचं अभिनंदन केलं.