छोटे कपडे घालणं Alia Bhatt ला पडलं महागात; झाली Oops Moment ची शिकार
मुंबईतील एका कार्यक्रमात आलियाने एकदम घट्ट आणि तोकडे कपडे घातले होते.
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर ट्रोल होते आणि प्रसिद्धीच्या झोतात येते. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट एकीकडे आई झाल्यामुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे ती एका ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे.ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात आलियाने एकदम घट्ट आणि तोकडे कपडे घातले होते. पांढऱ्या रंगाचा हा ड्रेस एकदम तोकडा होता. तिला या कपड्यांमध्ये धड बसता येत नव्हतं. यामुळे तिचे आतील कपडे नजरेत येऊ लागलेत. या गोष्टीची माहिती आलियाला समजताच ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र, तिला तोकड्या कपड्यामुळे सावरता आलं नाही. आलिया याआधीही वार्डरोब मॉलफंक्शनची शिकार झाली होती.
अनेकवेळा आलिया फिल्म इव्हेंट्समध्ये उप्स मोमेंटची शिकार झाली आहे आणि आता पुन्हा जेव्हा ती एका नवीन प्रोडक्टच्या लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा आलियाने पांढरा स्किन टाईट ड्रेस परिधान केला होता. मात्र या कार्यक्रमात आलियाला सोफ्यावर बसणं अवघड जात होतं आणि ती वारंवार तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली आणि याच दरम्यान ती ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली.
अभिनयासोबतच वादांशीही संबंधित आहे
आलिया भट्टच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई' या चित्रपटाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली असून हा चित्रपट आलियाच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला आहे मात्र तिच्या अभिनयासोबतच आलिया वादासाठीही ओळखली जाते.
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन तसंच नागार्जुन आणि मौनी रॉय देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'ब्रह्मास्त्र' गेल्या वर्षी 9 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया पुन्हा एकदा रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.