आलिया-रणबीर कपूरनं उरकलं लग्न? अभिनेत्रीकडून खुलासा
ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीर आणि आलिया यांचं प्रेम दिसून आलं आहे. या सिनेमामध्ये दोघंही एकत्र काम करताना दिसणार आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या दोघांचं लग्न कधी होणार याची तारीख चाहत्यांपर्यंत कधी पोहोचणार याची उत्सुकता आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांचं इन्स्टाग्राम अनेक युजर्स नियमिय फॉलो करत आहेत. कोरोनामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. लग्न पुढे गेलं आहे. त्यामुळे लग्नाला मुहूर्तच मिळेला झाला आहे.
याच सगळ्या दरम्यान आता चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झाल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्रीनं यासंदर्भात धक्कादायक कारण समोर आलं आहे. आलियानेही हैराण करणारा खुलासा केला आहे.
आलियाने एका मुलाखतीमध्ये रणबीर आणि तिच्या नात्यावर बोलताना लग्नाबाबतही खुलासा केला. आलिया म्हणाली की, मी माझ्या डोक्यात आधीच रणबीर कपूरशी लग्न केलं आहे. मी रणबीरशी मनाने आणि माझ्या डोक्यात आधीच लग्न केल्याचं म्हणताच चाहत्यांची मन तिने जिंकली आहेत. तिचं रणबीरवर किती प्रेम आहे याबद्दलही तिने सांगितलं आहे.
लग्नाबद्दल काय म्हणाला होता रणबीर?
एवढ्यात आलियाशी लग्न झालं असतं मात्र कोरोनामुळे लग्नाचा मुहूर्त काढता आला नाही असं रणबीर कपूर म्हणाला होता. रणबीर आणि आलिया लग्न करण्यासाठी किती उतावळे आहेत हे त्यावरून समजून येत आहे. आलिया आणि रणबीर एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीर आणि आलिया यांचं प्रेम दिसून आलं आहे. या सिनेमामध्ये दोघंही एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमाची चाहते आतूरतेनं वाट पाहात आहेत. आलिया गंगूबाई काठियावाडीच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त असल्याचं दिसत आहे.