मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे. जिचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. नुकताच या अभिनेत्रीच्या 'RRR' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आलिया भट्टचा हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट असणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सारा अली खानच्या भावाला नाकारताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाचा व्हिडिओ 
आलिया भट्टने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती करीना कपूरची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया करिनाच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील एका डायलॉगवर काम करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाही करीनाप्रमाणेच नखरे करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आलिया भट्ट 'Poo' म्हणून दिसत आहे आणि तिच्यासमोर मुलांची एक लाईन दिसत आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही या  व्हिडिओमध्ये दिसतोय आणि शेवटी रणवीर सिंगही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करीनाच्या फॅमिलीचा हिस्सा
या व्हिडिओवर करीना कपूरने आलिया भट्टचं जोरदार कौतुक केलं आहे. करिनाने हा व्हिडीओ पुन्हा शेअर करत लिहिलं आहे की, 'Poo पेक्षा भारी अजून कोणीच नाही.  आमच्या काळातील अप्रतिम अभिनेत्री, माय डिअर आलिया' आलिया, रणवीर सिंग आणि इब्राहिम अली खान यांच्याशिवाय करिनाने या पोस्टमध्ये करण जोहरलाही टॅग केलं आहे. रणबीर कपूरसोबतच्या लग्नामुळे चर्चेत असलेली आलिया भट्ट लवकरच करिनाच्या कुटुंबाचा भाग होणार आहे.