मुंबई : लडाखमध्ये जवानांच्या मृत्यूमुळे अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सध्या आलियाची पोस्ट चर्चेत आहे. लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली आहे. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संपूर्ण देश हादरला आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकारणी आणि बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर या घटनेचा शोक व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहेत. घटनेवर आलिया भट्टनेही शोक व्यक्त केला आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे



आलिया म्हणते, 'लडाखमधील सैनिकांसाठी प्रार्थना. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आलियाने जखमी सैनिक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. 


दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता आलियाचा 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अभिनेत्री पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. 


एवढंच नाही, तर आलिया अभिनेता रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ज्यामध्ये गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन मुख्य भूमिकेत दिसतील.