विकी-कतरिनासोबत आलियाचं गॉसिप! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ``अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड``
Katrina Kaif Vicky Kaushal Alia Bhatt VIDEO: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्टची. त्यातून आता विकी, कतरिना आणि आलियाची. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
VIDEO: अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा पहिला वहिला हॉलिवूडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कालच तिनं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून तिच्या 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 11 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची घोषणा आधीच झाली होती. आलिया गरोदर असताना तिनं आपल्या या पहिल्या हॉलिवूडपटाचे चित्रिकरण पुर्ण केले आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली असताना आता तिचं या चित्रपटातील कॅरेक्टरही रिव्हिल झाले आहे. या चित्रपटातून ती खलनायिकेच्या भुमिकेतून दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सध्या आलिया ही ब्राझीलमध्ये संपन्न होणाऱ्या नेटफ्लिक्सच्या Tudum 2023 साठी रवाना झाली आहे. त्यातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी ती काही एकटी नाही तर ती कतरिना आणि विकी कौशलसोबत स्पॉट झाली आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा आहे असं समजतं आहे. विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद येताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खानही प्रमुख भुमिकेत होती. या चित्रपटानंतर विकी कौशल हा कतरिनासोबत फिरायला रवाना झाला होता. त्यांचे फोटोजही व्हायरल झाले होते. यावेळी ते तिघंही एअरपोर्ट भेटल्याचे समजते आहे.
हेही वाचा - ''जावई बापू जय हो''; मिलिंद गवळी यांच्या 'त्या' पोस्टनं वेधलंय सर्वांचं लक्ष
विरल भय्यानीनं त्यांच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी म्हटलंय, 'आलिया आणि विकी व कतरिना विमानतळाच्या फर्स्ट क्लास लाऊंजमध्ये वाट पाहताना दिसतायत.' सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी म्हटलंय की, विकी-कतरिना आणि आलिया हे तिघं नक्कीच रणबीर कपूरबद्दल तक्रारी करतायत. तर एका युझरनं आलियाला टार्गेट केलंय आणि म्हटलंय की, काय आलिया अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड. तर अनेक जणं हे तिघं काय गॉसिप करत असतील याविषयी नाना प्रकारचे तर्क काढले आहेत.
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, कतरिना-विकी आणि आलियामध्ये चांगलीच मैत्री आहे. सोबतच त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या या दोस्तीवरही अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत.