आलियाकडे रणबीर कपूरच्या प्रेमाची निशाणी
या पोस्टमध्ये आलियाने रणबीरला मिस करत असल्याचं दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. कूल अंदाजातील एक फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पण आलियाचा हा फोटो रणबीर कपूरची आठवण करुन देणारा आहे.
या पोस्टमध्ये आलियाने रणबीरला मिस करत असल्याचं दिसत आहे. आलियाने रणबीरची कॅप घालून काही सेल्फी काढले आहेत. त्यातील काही फोटोज तिने पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
हे फोटो शेअर करत आलिया म्हणते, " तुम्हाला आठवण आल्यावर त्या स्पेशल व्यक्तीच्या काही गोष्टींची चोरी करा आणि त्या गोष्टीसोबत जास्त जास्त फोटो काढायला विसरु नका"
सध्या रणबीर कपूर आलियासोबत मुंबईमध्ये नाही. रणबीर श्रद्धा कपूरसोबत आगामी सिनेमाच्या शुटींगसाठी दिल्लीला गेला आहे. लव रंजन या सिनेमाचं शूट दिल्लीमध्ये केलं जात आहे. या सिनेमा अभिनेत्री डिंपल कपाडियासुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.