आलिया `टिप-टिप बरसा पानी`वर थिरकते तेव्हा...
आलिया लवकरच तिचं यूट्यूब चॅनेल सुरु करणार आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच तिचं यूट्यूब चॅनेल सुरु करणार आहे. नुकताचं आलियाने एक व्हिडिओ शेअर करत यूट्यूब चॅनेलची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये आलियाने अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप-टिप बरसा पानी' गाण्यावर केलेला एक छोटासा डान्स व्हिडिओही जोडला आहे.
सेलर कॅप, पिवळ्या रंगाच्या साडीत आलियाचा छोटाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डान्स करताना आलियावर पाण्याचे थेंबही उडवण्यात येत आहेत. आलियाचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. 'काहीतरी नवं, काहीतरी मजेशीर, काहीतरी यूट्यूबवर' असं म्हणत आलियाने यूट्यूब चॅनेलची घोषणा केली आहे.
यूट्यूब चॅनेलवरुन आलिया तिचं शेड्यूल, मेकअप, फॅशन, फिटनेस टिप्स अशा तिच्यासंदर्भातील अनेक गोष्टी शेअर करणार आहे. काही मीडिया रिपोर्टनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया २६ जून रोजी तिचं यूट्यूब चॅनेल लॉन्च करणार असल्याची माहिती मिळत आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट करण्यात येणार आहे. हे रिमिक्स गाणं अक्षय आणि कतरिना या जोडीवर चित्रित करण्यात आलं आहे.
सध्या आलिया तिच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आलियासह चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरही स्क्रिन शेअर करणार आहेत. आलिया-रणबीर ही ऑफस्क्रिन रिअल जोडी 'ब्रम्हास्त्र'मधून पहिल्यांदाच एकत्र ऑनस्क्रिन पाहायला मिळणार आहे.