मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलच्या 'राजी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा 40 सेकंदाच्या ट्रेलरचा टीझर रिलिज झाला आहे. यामध्ये आलिया भट्ट एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामध्ये ती बोलते की, हां मै राजी हू.... असा संवाद फोनवर बोलत आहे. आलिया भट्टने टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरला अधिक पसंती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाची कथा हरिंदर सिक्काने उपन्यास कॉलिंग सहमतवर आधारित आहे. राजी कश्मिरी मुलीची ही रिअल लाइफ स्टोरी आहे. 1971 मध्ये भारत - पाक युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते. या सिनेमांत पाकिस्तानी सेना अधिकारी भूमिकेत दिसणार आहे. 



या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि जंगली पिक्चर्स यांनी केली आहे. या सिनेमाची शूटिंग कश्मीर, पंजाब आणि मुंबईत केली आहे. आलिया आणि विक्की यांच्या या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. आलिया या दिवसांत 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाच्या तयारीत दिसत आहे.