आलिया भट्टचा रिलेशनशिपवर मोठा खुलासा; वयाच्या 15 व्या वर्षापासून होते मुलांशी संबंध
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. आलियाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अप्रतिम चित्रपट केले आहेत. आलिया सर्वात लोकप्रिय तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. 2012 मध्ये आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी आलिया सध्या मोठ्या बजेटचे बॉलिवूड चित्रपट साइन करते. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आलियाने 14 एप्रिल 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत लग्न केलं. दोन्ही कलाकारांनी 4 वर्षे एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. ज्याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. लग्नानंतर दोन्ही कलाकार आपापल्या करिअरकडे वळले आहेत.
मात्र नुकताच आलियाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया तिच्या पहिल्या रिलेशनशीपबद्दल बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ 2012 चा आहे. जेव्हा आलिया करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.
बोलत असताना आलिया म्हणाली की, तिचा पहिला बॉयफ्रेंड सहवीत असताना होता. दरम्यान, तिचा पहिला ऑफिशिअल बॉयफ्रेंड दहावीत होता. ज्याच्यासोबत ती सिरीअस रिलेशनशिपमध्ये होती. आलियाने त्याला २ वर्ष डेट केलं. त्यानंतर तो मुलगा आलियाला सोडून गेला. अभिनेत्रीच्या या पहिल्या नात्याबद्दल ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा पती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जो एक सुपर नॅचरल चित्रपट असेल. चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीरला पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहून चाहते खूप उत्सुक आहेत.