मुंबई : आलिया आणि रणबीरच्या लग्नाला अवघे काहीच दिलस उरले आहेत. या आठवड्यात हे कपल नात्याने पती-पत्नी होणार आहेत. वेडिंग डेच्या आधी  आलिया आणि रणबीरचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. एवढंच नव्हेतर आलिया-रणबीरचे लग्नातील कपड्यांमधील फोटो त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंतर आपण बऱ्याचदा या दोघांना टीव्हीवर  वधू आणि वरच्या वेशात पाहिलं आहे. पण यावेळी हे सत्यात उतरणार आहे. आता या लग्नाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा लग्नाचा फेक फोटो व्हायरल केला आहे. 



मंडपात बसलेलं दिसलं कपल
भांगेत कुंकू, नाकात नथ, हेवी ज्वेलरी, लाल जोड्यामध्ये आलिया स्माईल देताना दिसत आहे. तर  रणबीरदेखील शेरवानी आणि वरमाला घालून भरपूर खुश दिसत आहे. मंडपमध्ये बसलेले दोघं  हातात हात घालून लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहेत. जरी हा फोटो फेक असला तरी पहिल्या नजरेत हा फोटो खूपच रिअल वाटत आहे. आलिया आणि रणबीरचे असे बरेच फेक वेडींग फोटो आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता कितीही फेक फोटो समोर येवो. मात्र रिअल फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.