मुंबई : कोणत्याही एकाच गोष्टीवर मर्यादित न राहता अनेक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची इच्छा सगळ्यांच्याच मनी असते. बॉलिवूड मध्ये नेहमी हे चित्र पाहला मिळतं. काही कलाकार अभिनयाच्या क्षेत्रातून दिग्दर्शकाची भूमिका बजावतात तर काही निर्मीती क्षेत्राकडे कूच करतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आहे. सूत्रांनी सांगितल्यानूसार आलिया लवकरच एक नवीन प्रॉपर्टी विकत घेणार आहे. आलिया तिच्या या दुसऱ्या घराचा उपयोग तिच्या नव्या प्रोडक्शन ऑफिससाठी करणार आहे. खुद्द आलियाने या बातमीचा खुलासा केला आहे. ती म्हणते, 'हो...मी माझं स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे आणि या प्रोडक्शन हाऊसचे नाव 'इंटर्नल सनशाईन प्रोटक्शन' असे असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनय क्षेत्रातून निर्मिती क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, अमिर खान हे आता निर्मिती क्षेत्रातील फार मोठे खिलाड़ी झाले आहेत. त्याचप्रमाणे प्रियंका चोप्राचा होम प्रोडक्शन असणारा 'पर्पल पेबले पिक्चर्स' आणि नुकताच दीपिका पादुकोन आणि शाहिद कपूर हे त्यांच्या येणाऱ्या सिनेमांना निर्मित करणार आहेत. शाहिद आणि दीपिकाच्या पावलावर पाउल ठेवत आलिया निर्मिती क्षेत्राकडे वळणार आहे.  


आलिया लवकरच अभिषेक वर्मन यांच्या 'कलंक' सिनेमाच्या माध्यमातून चापत्यांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरून धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. आलियाचा हा बहुप्रतिक्षीत सिनेमा 19 एप्रिल रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.