आलियाने ड्रायवर आणि हेल्परला भेट म्हणून दिले घर
आलिया एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहे.
मुंबई : मुंबईकरांचे सर्वात मोठे स्वप्न असतं ते म्हणजे स्वत:च्या घराचे. आजच्या महागाईच्या काळात मुंबईत घर घेणं फार कठीण आहे. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या ड्रायवर आणि हेल्परला घर भेट म्हणून दिले आहेत. 'कलंक' सिनेमा स्टारर आलियाने दोघांना ५०-५० लाखांचे घर भेट म्हणून दिले आहेत. ७ वर्षांआधी बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात करणाऱ्या आलियाने टॉप स्टार्सच्या यादीत आपले नाव कोरले आहे. आलिया एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहे.
'स्टूडेंट ऑफ द ईयर' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड मध्ये डेब्यू केला होता. २०१२ साली हा सिनेमा सिनेमागृहात दाखल झाला होता. तेव्हा पासून हे दोघे आलिया साठी काम करत आहेत. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने सुनील आणि आमोलला घर भेट म्हणून दिले आहेत. आलियाने ५०-५० लाखांचे चेक दोघांना दिले आहेत. त्यानंतर या दोघांनी जुहू गल्ली आणि खार डांडा येथे घर बुक केले आहेत.
आलिया सध्ये तिच्या कलंक सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. १७ मार्च रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. त्यानंतर तिचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा वर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे आणि ती लवकरच अभिनेता सलमान सोबत 'इनशाल्लाह' सिनेमात झळकणार आहे.