मुंबई : 90च्या दशकात सर्वत्र फक्त गायिका अल्का यागनिक यांच्या गोड आवाजाची जादू होती. आता देखील त्यांच्या आवाजाला टक्कर देणारं कोणीचं नाही. बॉलिवूडच्या अनेक गाण्यांना त्यांनी आपला आवाज देत रसिकांना जगण्याची एक दिशा दाखवली. अल्का यागनिक यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातचं नाही, तर शेजारील देश पाकिस्तानात देखील आहे. नुकताचं  पाकिस्तानी अभिनेत्याने अल्का यागनिक यांच्या गाण्याला आपला आवाज दिला तेव्हा  त्यांनी त्या अभिनेत्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास (Imran Abbas) ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इमरान चोरी चोरी' चित्रपटातील  'तू मेरे सामने' गाणं गाताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत  इमरानने 90च्या दशकातील गाण्यांचं कौतुक केलं आहे. '90 दशकातील  गाण्यांवर असलेलं माझं प्रेम मी व्यक्त करू शकत नाही @therealalkayagnik आणि @uditnarayanmusicयांची गोष्ट समोर येताचं मी वेडा होवून जातो.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इमरानचं 90च्या  दशकातील गाण्यांवरचं प्रेम पाहूण अल्का यागनिक यांनी इमरानच्या पोस्ट पोस्टवर कमेन्ट करत म्हणाल्या, 'फार चांगलं गातोस... काय छान ड्राईव्ह करतो.' असं म्हणतं अल्का यागनिक यांनी देखील इमरानबद्दल प्रेम व्यक्त केलं. सांगायचं झालं तर पाकिस्तान अभिनेता इमरान अब्बास यानीही बॉलिवूडमध्ये काम केले आहे.



2014 साली आलेल्या 'क्रेचर 3डी' चित्रपटात इमरानने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री बिपाशा बासु (Bipasha Basu) देखील मुख्य भूमिकेत दिसली होती. शिवाय इमरानने 'ऐ दिल है मुश्किल' (Ae Dil Hai Mushkil) चित्रपटात  पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.