मुंबई : इंडिया ! इंडिया !  हा गजर ऐकला की कळून येतं की मॅच चालू आहे. भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे. भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. या निमित्ताने झी मराठीचे आवडते  कलाकार तुमच्या समोर त्यांचे क्रिकेट प्रेम व्यक्त करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सारं काही तिच्यासाठीची'  उमा म्हणजेच खुशबू तावडे ' मी शाळेत महिला क्रिकेट संघाची भाग होती आणि राज्य स्तरावर क्रिकेट खेळली आहे. मला आज ही लक्षात आहे आमच्या म्हात्रे गुरुजींनी घोषणा केली होती की महिलांचा क्रिकेट संघ आपण बनवतोय ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपली नाव नोंदवावी. पहिल्यांदा सीजन बॉल हातात घेतला आणि मी क्रिकेटच्या प्रेमात पडले. बॅटिंग पेक्षा बॉलिंग करण्यामध्ये मला जास्त मजा यायची कारण बॅट आणि माझी उंची एकच होती तेव्हा तर बॅट पकडायची म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. पण मग दहावीतला अभ्यास आणि तितकस मार्गदर्शन न मिळाल्यामुळे माझं क्रिकेट खेळणं सुटलं. क्रिकेट लहानपणा पासून माझ्यासाठी खूप जवळचा विषय राहिला आहे. भारतीय टीमला विश्वचषक मध्ये खेळताना बघायची नेहमीच उत्सुकता असते. १९ नोव्हेंबरला जरी शूट करत असली तरी सेटवर आमचं नियोजन चालू आहे. माझ्या मोबाईल मध्ये मॅचचे अपडेट नोटिफिकेशन चालूच राहणार. माझा आवडता खेळाडू हार्दिक पंड्या आहे ज्याला मी ह्या सामन्यामध्ये मिस करणार आहे. भारतीय टीमला इतकंच सांगेन बोलीन 'तुम्ही बेफिकिर होऊन खेळा आम्ही तुमच्या सोबत आहोत'


'सातव्या मुलीची सातवी मुलगी' नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे ' खूप जास्त उत्साही आहे.  पण १९ नोव्हेंबरला आमचं शूट असणार आहे. आमच्या सेटवर सर्व  क्रिकेट प्रेमी आहेत तर मोबाईलवर का होईना पण मॅच जरूर बघणार. आम्ही सर्व एकत्र सेटवर प्रत्येक विकेट आणि सेंचुरी  साजरी करणार. क्रिकेट आणि माझं नातं अतूट आहे मला कुठेही एक फळी जरी मिळाली तरीही मी क्रिकेट खेळायला सुरु करते. मी साधारण ८ वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला  सुरवात केली आणि १२वी ला जाईपर्यंत मी क्रिकेट खेळात होते. मी राष्ट्रीय स्तरावर ही क्रिकेट खेळली आहे. ह्या वेळी सेटवर विश्वचषक पाहण्याचा आनंदच वेगळा असणार आहे.


'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतला अभिषेक गावकर म्हणजेच तुमचा लाडका श्रीनु, 'मी चाळीत लहानपणापासून राहल्यामुळे गल्ली क्रिकेट रोज खेळायचो  आणि माझ्या घरी क्रिकेटच छोटं किट असायचं.  मी ऑल राऊंडर होतो आणि आता ही जेव्हा सेलिब्रिटी क्रिकेट मॅच होतात तेव्हा मी वेळ काढून खेळायला जातो. मला इतकं क्रिकेटच वेड आहे की, मी वरळीला राहत असल्यामुळे वानखडे स्टेडियम मध्ये खूप वेळा भारताची मॅच पाहायला जायचो. आज मी जर कलाकार नसतो आज तर नक्कीच क्रिकेटर असतो. भारतीय संघाने विश्व चषकाच्या प्रत्येक टप्यावर आतापर्यंत जे यश मिळवलं आहे. मला विश्वास आहे वर्ल्ड कप ही भारतच घरी आणणार.