मुंबई : जर साऊथचे कलाकार बॉलीवूडवर भारी पडत असतील तर त्याची अनेक कारणे आहेत. बॉलीवूड स्टार्स पैशांसाठी गुटख्याच्या जाहिरातींमध्ये काम करताना समाजातील तरुणांना चुकीचा संदेश देताना दिसले होते. यानंतर या जाहिरातींचा निषेधही करण्यात आला होता. दाक्षिणात्य स्टार्स अनेकदा आपली जबाबदारी पार पाडताना दिसले आहेत. हे देखील त्यांच्या लोकप्रियतेचं एक कारण आहे. पुष्पा या चित्रपटाचा स्टार अल्लू अर्जुनने नुकतंच हे सत्य पुन्हा सिद्ध केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जूनला दारूच्या एका ब्रँडच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली होती. मात्र अल्लू अर्जुनने ही जाहिरात करण्यास नकार दिला. त्याच्या या जाहिरातीमुळे त्याच्या चाहत्यांना काय शिकायला मिळेल याचा विचार तो करत होता. या कंपनीची जाहिरात करताना पाहून चाहतेही या दारूचे सेवन करतील आणि व्यसनाधीन होतील. असा त्याचा विश्वास होता. या जाहिरातीसाठी मिळालेल्या तगड्या फीपुढे अर्जुन झुकला नाही.


किती रक्कम मिळत होती
कोणत्याही प्रोडक्ट्सला एंडोर्स करण्यासाठी  अल्लू अर्जुन साधारण 7.5 कोटी फी आकारतो, तर कंपनी त्याला रु. 10 कोटी देऊ करत होती. उल्लेखनीय आहे की या लिकर ब्रँडच्या आधी त्याने तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात करण्यासही नकार दिला होता. त्याने आपल्या टीमला सांगितलं आहे की, तो अशा कोणत्याही प्रोडक्ट्सची जाहिरात करणार नाही जी नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीची आहे.


अल्लू अर्जुन तंबाखू किंवा अशा कोणत्याही उत्पादनाचे सेवन करत नाही आणि त्याच्या चाहत्यांनी या सवयींपासून दूर राहावं अशी त्याची इच्छा आहे. अल्लू अर्जुन पडद्यावरही अशी सीन करत नाही, जोपर्यंत ती कथा किंवा पात्रासाठी फार महत्त्वाची नसते. यामुळेच चांगली ऑफर मिळूनही त्याने विचार न करता ती ऑफर नाकारली.