मुंबई : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट खूपच सुपर-डुप हिट ठरत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाने 9 दिवसांतच अनेक कोटींचा व्यवसाय केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन बऱ्याच दिवसांपासून साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. काही काळापूर्वीच त्याची लोकप्रियता वाढली होती. पण 'पुष्पा: द राइज' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष केवळ चित्रपटाकडेच वळलं नाही तर अल्लू अर्जुनकडेही वळलं. ज्याने या चित्रपटाद्वारे सर्वांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण  केलं आहे.


'पुष्पा द राइज' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. मात्र आता चाहते सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा द राइज'ची कथा चंदनच्या तस्करांवर आधारित असून अल्लू अर्जुनने चंदन तस्करांविरुद्ध लढणाऱ्या पुष्पराजची भूमिका साकारली आहे.


त्याचबरोबर अल्लू अर्जुनने या चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन सीन दिले आहेत. जे चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर, बातम्या येत आहेत की, बॉलिवूडमधील अनेक बड्या दिग्दर्शकांच्या नजरा अल्लू अर्जुनवर खिळल्या आहेत आणि अनेक मोठे दिग्दर्शक अल्लू अर्जुनला त्यांच्या चित्रपटांसाठी कास्ट करण्यासाठी स्क्रिप्टवर विचार करत आहेत.


मात्र अल्लू अर्जुनने या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्याचबरोबर तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार याबद्दलही त्याने मौन बाळगलं आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनच्या बॉलीवूडमध्ये येण्याने बॉलिवूडला नवा सुपरस्टार नक्कीच मिळेल, ज्याचा आगामी काळात बॉलिवूडलाही खूप फायदा होईल.