Allu Arjun Movie Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे चाहते गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या 'पुष्पा 2: द रूल' ची प्रतीक्षा करत आहेत आणि आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर त्यानिमित्तानं चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगची सुरुवात ही 30 नोव्हेंबर रोजी होती. या चित्रपटानं 24 तासात 7.08 कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा 2' विषयी सध्या प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. हिंदीसोबत इतर भाषांमध्ये आगाऊ बूकिंगमध्ये या चित्रपटानं किती कोटींची कमाई केली हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवश काही तासांमध्ये 'पुष्पा 2' च्या 55 हजार पेक्षा जास्त तिकिटं आतापर्यंत विकली गेली आहे. त्यामुळे असा अंदाज बांधण्यात येत आहे की वर्ल्डवाइड पहिल्या दिवशी या चित्रपटाचं कलेक्शन हे 300 कोटींची होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, 'पुष्पा 2' चं दिग्दर्शन सुकुमारनं केलं आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रीलीला या चित्रपटात आयटम सॉन्ग करताना दिसत आहे. 'पुष्पा 2' ची जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून प्रेक्षक उस्तुक आहेत. पटनामध्ये ट्रेलरचं ग्रॅंड लॉन्च झाल्यानंतर आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. त्यासोबत आगाऊ बूकिंगचा आकडा काल पासून वाढत चालला आहे. 


'पुष्पा 2' आणि इतर चित्रपटांचं आगाऊ बूकिंग


'पुष्पा 2' च्या पहिल्या दिवसाच्या आगाऊ बूकिंगविषयी बोलायचं झालं तर sacnilk च्या रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण देशात 8 कोटी 81 लाख पेक्षा जास्त तिकिटांचं आतापर्यंत बूकिंग झालं आहे. त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आगाऊ बूकिंग आधीच  'पुष्पा 2' नं 8.8 कोटींची कमाई केली. दरम्यान, अजून हा चित्रपट प्रदर्शित व्हायला 4 दिवस शिल्लक आहेत. तर या चित्रपटाचं इतर चित्रपटांत्या आगाऊ बूकिंगशी तुलना करायची असेल तर 'बाहुबली 2' आणि 'KGF 2' चा देखील रेकॉर्ड मोडू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.


मोडला 52 वर्षांमधील हा रेकॉर्ड


'बॉलिवूड हंगामा' च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं मुंबईच्या प्रतिष्ठित गेयटी-गॅलेक्सी मल्टीप्लेक्सच्या सगळ्या 6 स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. असं करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे रोज 18 शो होणार आहेत. तर 'पुष्पा 2' ज्या 6 स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे, त्यात गेयटी, गॅलेक्सी, जेमिनी, गॉसिप, जेम आणि ग्लॅमर हे सहभागी आहेत. आजवर इथे जे चित्रपट प्रदर्शित झाले ते 2-3 थिएटरमध्ये दाखवण्यात आले. तर 1972 मध्ये बनवण्यात आलेल्या या मल्टीप्लेक्समध्ये 52 वर्षांनी सगळ्या 6 थिएटरांमध्ये एकच चित्रपट दाखवण्यात येणार आहे. 


हा चित्रपट हिंदी चित्रपटांमधअये सगळ्यात जास्त आगाऊ बूकिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला आहे. बिहार, गुजरात, आसाम आणि छत्तीसगडमध्ये या चित्रपटाची तिकिट पटपट विकली जात आहेत. 


हेही वाचा : वडील चंकी पांडेचे चित्रपट पाहून 'ट्रॉमेटाइज' व्हायची अनन्या पांडे? म्हणाली - मला भीती वाटायची


ओपनिंग डे च्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर sacnilk रिपोर्टनुसार, हा चित्रपट वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई करू शकतो. तर देशात 233 कोटींची कमाई करू शकतो. तर ओवरसीज हा चित्रपट 70 कोटींची कमाई करु शकतो.