मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र चित्रपट पुढे ढकलले जात आहेत, तर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' अजूनही चित्रपटगृहात आहे. तो बॉक्स ऑफिसवर धमाका करत  बंपर कलेक्शनही करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाने मागील अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाची हिंदी भाषेत सुरुवात खूपच संथ होती पण हळूहळू त्याचे कलेक्शन वाढत गेले.


आतापर्यंत या चित्रपटाने हिंदीत 100 कोटी आणि जगभरात 350 कोटींचा आकडा गाठला आहे. या चित्रपटाने प्रभासच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली'ला मागे टाकत आणखी एक विक्रम केला आहे. या चित्रपटाने सहाव्या आठवड्यात सुमारे 6 कोटींची कमाई करून प्रभासच्या 'बाहुबली'सह अनेक बॉलिवूड चित्रपटांनीही बाजी मारली आहे.


सहाव्या आठवड्यातील कमाईनेही अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले. प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, पुष्पाने 'बाहुबली' आणि 'बधाई हो'ला मागे टाकल्याचे सांगण्यात आले आहे.


पुढचे काही आठवडेही पुष्पाच्या चित्रपटासाठी चित्रपटगृहांमध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नाही. यावरून पुष्पा आणखीही अनेक विक्रम मोडणार आहे, असं देखील समोर आलं आहे.


या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाला कोरोना महामारीचा फटका बसला की फायदा झाला, हाही एका वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. कारण जिथे लोक थिएटरमध्ये कमी जातात, तिथे दुसरा मोठा चित्रपट नसल्यामुळे लोक फक्त 'पुष्पा' बघत आहेत. त्यामुळे आता भारतातच नव्हे, तर जगभरात केवळ पुष्पाचीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.