South Celebs Costly Wedding: असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. आता ही ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. कित्येकदा त्या ओळीचा तुम्हाला कंटाळाही आला असेल. कारण, काही नाती त्यांचा पाया भक्कम असल्यामुळे टिकली, पण काही नात्यांनी मात्र सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच दगा दिल्याचं पाहायला मिळालं. काही सेलिब्रिटींच्या परिकथांचा शेवट गोड झाला नाही आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य कलाजगतामध्येही अशी काही नाती पाहायला मिळाली. त्यातचं प्रेमाच्या बळावर उभं राहिलेलं एक नवं नात म्हणजे अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन. नयनताराला विग्नेशच्या रुपात अखेर प्रेम मिळालं आणि तिच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु झाली. तिच्या लग्नासाठी बड्या सेलिब्रिटींची हजेरी होती. 



काही वर्षांपूर्वीच अभिनेता ज्युनियर एनटीआर विवाहबंधनात अडकला होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या लग्नात 100 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले होते. या सेलिब्रिटीच्या लग्नाचं दाक्षिणात्य वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 



अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांनी 2017 मध्ये गोव्यात लग्न केलं. जवळपास 10 कोटी रुपये त्यांनी या लग्नावर खर्च केले. पण, त्यांच्या नात्याने वेगळं वळण घेतलं आणि अवघ्या चार वर्षांतच त्यांच्यात दुरावा आला. मागील वर्षीच या जोडीनं घटस्फोट घेत हे वृत्त जाहीर केलं. (samantha ruth prabhu, naga chaitanya)



अभिनेता अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या लग्नावरही 100 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. दाक्षिणात्य कलाविश्वातील ही सध्याची सर्वात हॅपनिंग जोडी आहे. (Allu Arjun sneha reddy)



अभिनेता राम चरण यानं उपासना कामिनेनी हिच्याशी लग्न केलं. हा एक शाही विवाहसोहळा होता. या सोहळ्यासाठी देशातील बऱ्याच दिग्गज कलाकारांची हजेरी होती. 



अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिचं लग्न, अभिनेता धनुष याच्यासोबत झालं होतं. या लग्नावर बराच खर्चही करण्यात आला होता. पण, हे नातंही काही वर्षांनंतर विभक्त होण्याच्या वळणावर आलं आणि चाहत्यांना धक्का बसला. (Rajinikanth daughter wedding)