मुंबई : साऊथ इंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा: द राइज' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटासोबतच या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.


पुष्पाच्या यशानंतर साऊथपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक सुप्रसिद्ध दिग्दर्शक या अभिनेत्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये दिसला आहे.


अल्लू अर्जुनला संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर पापाराझींनी स्पॉट केले आहे. अल्लू अर्जुन यावेळी कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. अल्लू अर्जुनला भन्साळींच्या ऑफिसबाहेर पाहिल्यानंतर, दोघे एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची चर्चा पसरली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांना वाटत आहे की अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूड सिनेमात दिसू शकतो. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. पण याबाबत अद्याप दिग्दर्शक भन्साळी यांच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.


अल्लू अर्जुनचा हिंदी सिनेमा रिलीज झाला तर ही चाहत्यांसाठी  मोठी गोष्ट ठरु शकते. आता अल्लू अर्जुन ही गुड न्यूज चाहत्यांना देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


अनेकांनी अल्लू अर्जुन या ठिकाणी स्पॉट होताच तो लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.