Allu Arjun Pushpa 2 : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' मुळे चर्चेत आहे. सध्या अल्लू अर्जुन हा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्यानं एका कार्यक्रमात शूटिंग संबंधीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यावेळी अल्लू अर्जुननं सांगितलं की त्याला या चित्रपटाचं शूटिंग लवकरात लवकर संपवायचं होतं. त्याचं कारण कोणता नवा चित्रपट नसून त्याची मुलगी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जुननं सांगितलं की गेल्या पाच वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करतोय. त्याला लवकरात लवकर पुष्पाचं शूटिंग संपवायचं होतं. कारण या भूमिकेसाठी त्याला दाढी वाढवणं बंधन कारक होतं. त्यामुळे त्याला लवकरच शूटिंग संपवून दाढी काढायची होती. अल्लू अर्जुन म्हणाला, 'मी या चित्रपटाचं शूटिंग जवळपास पाच वर्ष केलं आहे. त्यात पहिला आणि दुसरा भाग दोन्ही चित्रपटांवर काम करणं आहे. या चित्रपटाची शूटिंग संपण्याची मी प्रतीक्षा करत होतो. कारण मला क्लीन शेव करायची होती. दाढीमुळे माझी मुलगी माझ्याजवळ येत नव्हती. तिचा मी मुका घेऊ शकत नव्हतो कारण माझी दाढी. मी गेल्या तीन-चार वर्षांमध्ये नीट तिचा मुका ही घेतलेला नाही.'



अल्लू अर्जुननं सांगितलं की जेव्हा पुष्पाचं शूटिंग संपवलं त्यानंतर तो खूप भावूक झआला होता. त्याविषयी सांगत अल्लू अर्जुन म्हणाला की जेव्हा शूटिंग पूर्ण झालं त्यादिवशी मी खूप शांत होतो. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. मी ज्या चेहऱ्याला गेली 5 वर्ष पाहत होतो. त्यांच्याकडे मी पुन्हा पाहिलं. अल्लू अर्जुन म्हणाला की या चित्रपटाला हिट करणं खूप महत्त्वाचं होतं. फक्त स्वत: साठी नाही तर संपूर्ण तेलगू इंडस्ट्रीसाठी देखील. जेव्हा पुष्पाचा पहिला भाग हिट झाला आणि सर्वेमधून हे समोर आलं की हा चित्रपट भारतातील सगळ्यात हिट चित्रपट आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली होती. 


हेही वाचा : कॉन्सर्टमध्ये Shah Rukh Khan च्या गाण्यावर थिरकली Dua Lipa; सुहानानं शेअर केला खास VIDEO


दरम्यान, 'पुष्पा 2' हा 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.