मुंबई : 'अमर अकबर एंथोनी' हा मल्टीस्टारर सिनेमा २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झाला. जो बॉक्स ऑफिसवर कमालीचा हिट ठरला. अमिताभ बच्चन, ऋषि कपूर, विनोद खन्ना, परवीन बाबी, नीतू कपूर आणि शबाना आझमी हे कलाकार या सिनेमांत मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचं नाव 'अमर अकबर अँथनी' होतं. या चित्रपटात प्राण आणि निरुपा रॉय या सारख्या कलाकारांचीही भूमिका होती. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट ठरला. मात्र, हा चित्रपट बनविण्यामागची कहाणी खूप रंजक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९७५मध्ये जेव्हा दिग्दर्शक मनमोहन देसाई, वृत्तपत्र वाचण्यासाठी बसले होते तेव्हाची ही गोष्ट आहे. वर्तमानपत्रात अशी एक बातमी छापून आली होती. जी वाचून मनमोहन देसाई आश्चर्यचकित झाले. एका व्यक्तीने आपल्या 3 मुलांसोबत गार्डनमध्ये येऊन मुलांना तिथेच सोडून दिलं आणि आत्महत्या केल्याची बातमी एका वृत्तपत्रात आली होती. ही बातमी वाचल्यानंतर दिवसभर मनमोहन देसाईंच्या मनात हाच विषय सतत सुरु होता


संध्याकाळी जेव्हा ते लेखक प्रयाग राज यांना भेटले तेव्हा त्यांनी बातमीबद्दल त्यांना सांगितलं आणि ते म्हणाले की, 'जर ती व्यक्ती पुन्हा आली आणि त्या व्यक्तीने आत्महत्या केलीच नाही आणि ती तिघंही मुलं तिथे नसतील तर? या मुलांना जर, तीन वेगवेगळ्या धर्माची माणसं घेवून गेली तर, एक हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांनी या तीन मुलांना घेतलं तर काय होईल?


मनमोहन देसाई आणि प्रयाग राज यांच्या चर्चा हळूहळू एक कथा तयार करत होती. दुसर्‍या दिवशी दोघांची पुन्हा भेट झाली आणि यावेळी मनमोहन यांची पत्नी जीवन प्रभा देखील त्यांच्यासोबत होत्या.


हळू हळू गोष्टी सुरु झाल्या आणि तिघांनी एकत्र येऊन एक आश्चर्यकारक कथा तयार केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही मनमोहन देसाई यांनी केली होती. चित्रपटाची कथा प्रयाग राज, कादर खान आणि केके शुक्ला यांनी लिहिली होती.


हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. चित्रपटाच्या गाण्यांपासून ते डायलॉगपर्यंत सगळं काही सुपरहिट ठरलं. आजही या सिनेमाला प्रेक्षकांची तेवढीच पसंती आहे.