Old Song Shoot in Dirty Water : हिंदी चित्रपट हे आपल्याला जितके मोठे आणि रंगतदार रूपेरी पडद्यावर दिसतात तेवढीच त्यामागे मोठी मेहनतही असते. त्यामुळेच आपल्याला त्याचा आभास रूपेरी पडद्यावरून घेता येतो. चित्रपटाचे शुटिंग करणे हे काही सोप्पे नाही त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्यामुळेआपल्याला चित्रपटाचे Behind The Scenes पाहिल्यावर लक्षात येतं की चित्रपटाचे चित्रीकरण करणं किती कठीण असतं. पुर्वीही चित्रपटांसाठी मोठी मेहनत घेतली जायची. परंतु तेव्हा सोशल मीडिया हा इतका एक्टिव नव्हता. त्यामुळे सेटवरील गमतीजमती कळायला फार वेळच लागायचा. आता सोशल मीडियावरून त्या लगेचच पोहचणं सोयीस्कर होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्यात तुम्हाला शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना एका नदीवर होडीत बसलेले दिसत आहे. परंतु जर का तुम्ही या चित्रपटाचा क्लोज शॉट आणि मिड शॉट पाहिलात तर तुम्हाला दिसले की हे गाणं नदीवर शूट केलेलं नाही. यासाठी एक सेट तयार केला होता. यावेळी त्याच्या पाठीमागे नदीचे इफेक्ट दिले होते. एका ठिकाणी नदी बसलोय असं वाटण्यासाठी पाणी भरण्यात आले होते आणि त्याच्या होडीत ते दोघं बसले होते आणि मग त्यातून तो शॉट घेण्यात आला होता. पुर्वीही अनेक सिनेमे गाजायचे तेही त्यांच्या गाण्यांसाठी आणि त्यांच्या सेट्ससाठी. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'अमर प्रेम' हा.


या चित्रपटातील तुम्ही चिंगारी कोई भडके. हे गाणं ऐकलंच असेल. हे गाणं नक्कीच तुमच्या पसंतीचे आहे. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या गाण्यानं चार चांद लावले होते. तुम्हाला माहितीये का की या गाण्यामागे एक स्टोरी आहे. हे गाणं हावडा ब्रिजच्या नदीच्या ठिकाणी शूट झाला नाही. 


अभिनेत्री शर्मिला टागोरनं एक शोमधून याबद्दलचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की या गाण्याला शूट करण्यासाठी त्यांना नाक बंद करून जावे लागायचे अशी आठवण त्यांनी सांगितली होती आणि हे पाणीही अत्यंत घाणेरडे होते असे त्यांनी सांगितले. त्यातून प्रचंड वास येत होता. परंतु गाणं छान होण्यासाठी त्यांनी कशातही कमतरता सोडली आहे. त्यांनी त्याच होडीत बसून हे सदाबहार गाणं शूट केलं आहे. त्यांनी या संपुर्ण गाण्याच्या शूटमध्ये कसेलच नखरेही दाखवले नाही. अशीही आठवण आहे. त्यामुळे या गाण्याची तेव्हा फार चर्चा झाली होती. आजही हे गाणं फार लोकप्रिय आहे.