Johnny Depp Amber Heard Trial: गेल्या काही दिवसांपासून एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. नात्यात आलेलं वादळ आणि त्यानंतर उदभवलेली परिस्थिती या साऱ्यामुळं ही जोडी सातत्यानं प्रकाशझोतात आहे. जिथं पत्नी, पीडिता म्हणून समोर आली आहे. तर, अभिनेत्यावर अत्याचार करण्याचे गंभीर आरोप लगावले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सेलिब्रिटी जोडी आहे, जॉनी डेप आणि त्याची एक्स वाइफ एम्बर हर्ड. तिनं जॉनीवर कौटुंबीक हिंसेचे आरोप केले. ज्यानंतर जॉनीनं तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. 


नुकतंच एम्बरनं न्यायव्यवस्थेसमोर जॉनीसोबतच्या तिच्या नात्याची काळी बाजू प्रकाशात आणली. जिथं, त्यानं नशेत आपल्याशी बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगत आपल्याला मारहाणही केल्याचं ती म्हणाली. (Johnny Depp Amber Heard Trial)


जॉनीनं काचेच्या बाटलीनं आपलं शारीरिक शोषण केल्याचंही तिनं सांगितलं ज्यामुळं ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. 


जॉनी मद्यधुंद अवस्थेतच असायचा, डीप ड्रग्ज घ्यायचा. याच नशेच्या आहारी गेल्यानंतर तो एम्बरला मारहाण करत होता. पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या नावावरून काढलेल्या टॅट्टूवरून जेव्हा एम्बरनं वक्तव्य केलं तेव्हा त्यानं पहिल्यांदाच तिच्यावर हात उगारला होता. 



एका घुसमटवणाऱ्या नात्यामध्ये एम्बरनं जसे दिवस काढले, त्याची आप बीतची सांगत असताना तिच्या आसवांचा बांध फुटला. तिचा हाच आक्रोश साऱ्या जगानं पाहिला आणि आता या खटल्यात पुढील कारवाई काय होते यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.