मुंबई : मनमुराद हसणे हे आपल्या आयुष्यात नेहमीच फायदेशीर ठरते. आजच्या या धकाधकीच्या जीवनातून काहीवेळ सर्व ताण तणाव  विसरून आपल्याला काही मनोरंजनाचे  क्षण देण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर एक निखळ हास्यउमटवण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी सिनेमे आणि नाटक अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. त्यात काम करणारे हास्यकलाकार यांना मिळणारा मान प्रसिद्धी ही इतर आघाडीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत फारच कमीअसते. मराठी  रंगभूमी आणि सिनेमाशी निगडित पुरस्कार सोहळ्यात सुद्धा विनोदी नाटक आणि सिनेमांना योग्य ते महत्व मिळत नाही . त्यामुळेच विनोदी शैलीला त्याचे एक व्यासपीठ देण्यासाठी आणि मराठी विनोदाला एक वेगळादर्जा देण्यासाठी,  झी टॉकिजने अतिशय अभिमानाने 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' हा हास्याचा उत्सव साजरा करायला प्रारंभ केला. झी टॉकीज वर, झी कॉमेडी अवॉर्ड्स २०१८ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या वर्षी याकार्यक्रमाचे हे ५ वे वर्ष  असून झी टॉकिज कॉमेडी अॅवॉर्डस अजून दिमाखदार होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेळी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता करणार आहे. उत्तम अभिनय कौशल्य आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारं कमाल सेन्स ऑफ हयूमर असलेला अभिनेता अमेय वाघ यावेळी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे हे कळले, "अमेय हा त्याच्या उत्तम कॉमेडी टाईमिंगसाठी ओळखला जातो तसेच त्याच्यासोबत काम करताना सर्व कलाकारकम्फर्टेबल असतात. त्याला उत्तमरित्या माहिती असतं की प्रेक्षकांना त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, त्यामुळे तो प्रेक्षकांचं योग्यरीत्या मनोरंजन करू शकतो. मालिका, चित्रपटांमधील तसेच वेब सिरीजमधील त्याचा कमालीचाअभिनय प्रेक्षकांना स्क्रीनकडे खेचून आणतो. अमेय हा प्रेक्षकांचा लाडका आहे आणि तो त्यांचं हवं तेवढं मनोरंजन करू शकतो त्यामुळे तो एका कॉमेडी अवॉर्ड्स शोचे सूत्रसंचालन करण्यासाठी अगदी योग्य आहे."
अमेय खुद्द या बातमीवर शिक्कामोर्तब करत म्हणाला, "मला अभिनयासोबत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला देखील आवडतं. यावर्षीच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सच सूत्रसंचालन मी करणार आहे आणि त्यासाठी मी उत्सुकआहे."


अमेय सोबत चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता सागर कारंडे आणि भाऊ कदम देखील सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. सागर व भाऊच अफलातून सेन्स ऑफ हयूमर आणि कॉमिकटाईमिंग  व त्यात अमेय वाघाच्या मिश्किल विनोदांची फोडणी म्हणजे यावर्षीचे झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स प्रेक्षकांसाठी हास्याचं वादळ घेऊन येणार आहेत यात काही शंकाच नाही.