Fussclass Dabhade : ‘फसक्लास दाभाडे’ ही वेड्या भावंडांची एक विलक्षण कथा असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची चर्चा सुरु होती. यात सोशल मीडियावर निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक उघड केला आहे. हेमंत ढोमे लिखित ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत असून अमेय वाघने मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. या पोस्टरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टरमधून भावंडांच्या बंधांचा एक विनोदी पद्धतीने आणि मनापासून शोध घेत असल्याचे दिसतेय. कॅप्शनमध्ये म्हटले आहे, 'झिम्माच्या टीमकडून, वेड्या भावंडांची एक विलक्षण कथा...सोनू, पप्पू, तायडी आणि त्यांचे तितकेच वेडे पण हृदयस्पर्शी कुटुंब. 15 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!'



निर्माते आनंद एल राय म्हणतात, 'फसक्लास दाभाडे' ही एक अशी कथा आहे, जी भावंडांच्या नात्यातील गुंतागुंत सुंदरपणे मांडते. हा अशा बंधनाचा उत्सव आहे, जिथे प्रेम, शत्रुत्व आणि विनोद आनंदीपणे एकत्र राहतात. हेमंत ढोमे यांनी या अनोख्या भावंडाची कहाणी अतिशय मोहकतेने आणि नातेसंबंधाने जिवंत केली आहे आणि कलर यलो प्रॉडक्शनच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा मला अभिमान आहे. मला खात्री आहे की, हा चित्रपट अनेकांना जवळचा वाटू शकतो, ज्याने कधीही भावंडासोबत हे विशेष बंध शेअर केले आहेत.'


निर्माते भूषण कुमार म्हणतात, 'फसक्लास दाभाडे' नात्यांमधील मानवी भावनांचे अतिशय साधेपणाने चित्रण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट त्याच्या मानवी कथानकाद्वारे खोलवर जोडतो. भारतातातील, विशेषतः महाराष्ट्रातील कौटुंबिक जीवन प्रतिबिंबित करणाऱ्या या चित्रपटाची दोलायमान संस्कृती आणि हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा घेऊन येणारी आहे.'


या चित्रपटाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, 'हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिले ते सगळे मी यात मांडायचा प्रयत्न केला आहे. कोणीतरी असे म्हणाले आहे, सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो. चित्रपट बनवताना ठरवले होते, हा चित्रपट आपल्या गावीच स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत चित्रीत करायचा आणि विशेष म्हणजे माझ्या लाडक्या टीमसोबत माझी ही इच्छा पूर्ण देखिल झाली. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून 15 नोव्हेंबर रोजी तो तुमच्या भेटीला येणार आहे.''


हेही वाचा : बिग बींपेक्षाही श्रीमंत आहे त्यांची नात नव्या! वारसा हक्कानं मिळालीये 'इतकी' संपत्ती


‘फसक्लास दाभाडे’ हा टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे ज्यामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांचे रियुनियन होणार आहे. टी सिरीज फिल्म्स आणि आनंद एल राय प्रस्तुत, भूषण कुमार, आनंद एल राय, क्षिती जोग आणि क्रिशन कुमार निर्मित.