मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) चित्रपट ११ ऑगस्ट रक्षाबंधनच्या निमित्तानं प्रदर्शित झाले. हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटाचे अचानक शो कमी झाले. हे पाहता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सगळ्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी बॉलिवूड चित्रपटांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अमेय खोपकर यांनी तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये अमेय म्हणाले, गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या टाईमपास 3, दे धक्का 2 आणि एकदा काय झालं या मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झालेले आहेत. लालसिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे हे शोज कमी करण्यात आले आहेत.



आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


दुसऱ्या ट्वीटमध्ये अमेय पुढे म्हणाले, ज्याठिकाणी मराठी चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी मिळते तिथूनही हद्दपार करण्यात आलंय. तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का? मोठा वीकेंड आहे म्हणून बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटांनाही कमाई करायची आहे.



आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर



आणखी वाचा : King Cobra ला Kiss करण्यासाठी मुलीनं केलं असं काही, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का


पुढे अमेय खोपकर म्हणाले, हे लक्षात न घेता जी मुजोरी हिंदीवाल्यांनी चालवली आहे,ती त्वरित थांबली पाहिजे आणि मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली आहे.