मुंबई : अभिनेता Sushant Singh Rajput, death सुशांत सिंह राजपूत यानं वयाच्या ३४ व्या वर्षी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आणि साऱ्या कलाविश्वाला जबर हादरा बसला. सुशांतनं उचललेलं हे पाऊल काही प्रश्नांना वाचा फोडून गेलं, ज्यामध्ये कलाविश्वात पाय घट्ट रोवलेल्या घराणेशाहीवर अनेकांनी निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराणेशाहीचा उल्लेख होताच सेलिब्रिटी मंडळींनी बॉलिवूडमधील प्रस्थापितांना धारेवर धरत त्यांच्या पक्षपातीपणावर बोचरी टीका केली. आदित्य चोप्रा, करण जोहर अशा निर्माता- दिग्दर्शकांनी आतापर्यंत अनेकदा सेलिब्रिटींच्याच मुलांना, नातेवाईक मंडळींना सिनेजगतात प्राधान्य दिलं आहे. ही बाब अधोरेखित करत त्यांना बोल लावण्यात आले. 


इथं KARAN JOHAR करण जोहरनं सुशांतच्या निधनानंतर दु:खही व्यक्त केलं. पण, त्याच्यावर उठलेली टीकेची झोड मात्र काही केल्या कमी होत नाही आहे. हा सर्व प्रकार पाहता बुधवारी करणनं एक मोठा निर्णय घेतला. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या सेलिब्रिटीनं ट्विटरवर अनेक अकाऊंटना अनफॉलो केलं. एकिकडे करणच्या फॉलोअर्सचा आकडा कमी होत असतानाच त्यानंही इतरांना फॉलो करणं बंद करणं ही बाब काहीशी खटकणारी ठरली. 


 


सध्याच्या घडीला करण ट्विटरवर फक्त आठ अकाऊंट फॉलो करत आहे. ज्यामध्ये चार ही त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेशी संबंधित आहेत. तर उरलेल्या तीन अकाऊंटमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटचा समावेश आहे. करणनं नेमकं हे पाऊल का उचललं याचं उच्चर अद्यापही अस्पष्ट असलं तरीही या प्रकरणी तो नेमकी काही प्रतिक्रिया देणार का, याकडेच साऱ्यांचं लक्ष आहे.