मुंबई : कलाविश्वात चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत चाहत्यांचं अमाप प्रेम मिळवणारी जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची. त्यांच्या रिलेशनशिपच्या वृत्ताने अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, पाहता पाहता याच जोडीला चाहत्यांनी भरभरुन प्रेमही दिलं. अशा या नात्यात गेल्या काही दिवसांपासून सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं होतं. पण, या अफवांना शह देत रणबीर आणि आलियाने एका पुरस्कार सोहळ्याला एकत्र हजेरी लावली आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलियाच्या नात्यात वादळ आलं असून, ब्रेकअप होण्याच्या वळणावर त्यांचं नातं पोहोचल्याचं म्हटलं जात होतं. रणबीर या नात्यात कुठेच गवसत नसल्यामुळेच त्याच्यावर आलिया नाराज असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, पुरस्कार सोहळ्याचा त्यांना एकत्र पाहून मात्र या साऱ्याची पुसट चिन्हंही दिसली नाहीत. त्यामुळे ही सकारात्मक बाब आहे, असंच म्हणावं लागेलं. 




आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असूनही वेळात वेळ काढत रणबीर- आलियाने पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. तेव्हा त्यांची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांमध्येही गडबड पाहायला मिळाली. यावेळी गडद राखाडी रंगाच्या टक्सेडोमध्ये रणबीर अतिशय रुबाबदार दिसत होता. तर, हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या अनारकली ड्रेसमध्ये आलियाही सुरेख दिसत होती. यावेळी त्या दोघांनीही फोटोसाठी एकत्र पोझ दिल्याचंही पाहायला मिळालं. रणबीरने एका मुलाखतीदरम्यान आलियासोबतच्या नात्याविषयी कबुली दिली होती. ज्यानंतर या दोघांच्याही नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं. यंदाच्या वर्षी आलिया आणि रणबीर साखरपुडा करणार असल्याचंही कळत आहे.