Amir Khan : चार वर्षांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आता 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे. त्यामुळे आता तो 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच आमीर खान हा साऊथच्या चित्रपटवल्लींना भेटून आला आणि यानिमित्ताने त्याने रजनीकांत, चिरंजीवी आणि राजमौली यांना त्यांनी 'लाल सिंग चढ्ढा'चे स्पेशल स्क्रिनिंगही दाखवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खान आणि भोजपुरी सुपरस्टार गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या खूप चर्चेत आहेत. सध्या यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खानने Zee बिहार चॅनलला मुलाखत दिली. मुलाखतीच्या वेळी अक्षरा सिंग एकंर होती. 


असा म्हटला भोजपुरी डायलॉग...
मुलाखतीच्या दरम्यान अक्षराने आमीर खानकडून एक भोजपूरी डायलॉग बोलवून घेतला त्यात आमीर खान म्हणाला... ''फटी तो फटी लेकिन पावर ना घटी...'' 


ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी केले शुटिंग...
या मुलाखतीत अक्षराने आमिरला विचारले की, 'लाल सिंग चड्ढा'चे अनेक ठिकाणी शूटिंग झाल्याचे आम्ही ऐकले आहे. शुटींग दरम्यान असे काही किस्से किंवा अशी कोणती घटना तुमच्या लक्षात आहे का? या प्रश्नाच्या उत्तर देताना आमिरने सांगितले की, हा चित्रपट करताना खूप शारीरिक आव्हाने माझ्यासमोर होती. आमिरने सांगितले की जेव्हा तो कारगिलला शूटिंग करत होता तेव्हा कठीण परिस्थितीचा त्याला सामना करावा लागला. लॉकेशनच्या ठिकाणी रस्ता नव्हता मग तिथे रस्ता तयार करण्यात आला. रस्ता तयार झाल्यानंतर संपूर्ण युनिट तिथे पोहोचले आणि महिनाभर तरी तिथे शूटिंग सुरू होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की तिथे ऑक्सिजनही नव्हता. शूटिंग करताना खूप त्रास झाला. शूटिंगदरम्यान आमिरला 5-6 वेळा ऑक्सिजन तरी घ्यावा लागला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आमिर खानचा चित्रपट 11 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा आमिर खानसोबत दिसणार आहे.