मुंबई : बॉलिवूड किड्स नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची मुलगी इरा खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. इराने स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत डॉन्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. इराने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे' असं म्हटलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरा नेहमीच बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इशाने तिच्या प्रेमाचा खुलासा केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. याआधीही त्यांना अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आले होते.


इराला फिल्म-मेकिंमध्ये आपले नशीब आजमावयचे आहे, तर आमिरच्या मुलगा जुनैद याला अभिनेता म्हणून कलाविश्वात राज्य करायचे आहे. इरा खान आणि जुनैद खान अभिनेता अमिर खान आणि रिना दत्ता यांची मुलं आहेत.