मुंबई : 22 वर्षांपूर्वी अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला, पण या चित्रपटानंतर अभिनेत्रीचा एकच चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला ज्याचे नाव आहे 'गदर'. त्याचबरोबर, अभिनेत्रीने तिच्या सह-अभिनेत्यासोबतचा इतका जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे की, फोटोतील अभिनेत्याला ओळखणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता सध्या त्याच्या लूकमुळे इतका लोकप्रिय आहे की, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोज देताना दिसले
अमिषा पटेल खुर्चीवर बसलेल्या या अभिनेत्यासोबत कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. अमिषाने हा फोटो तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी काढला होता. अभिनेत्रीचा हा थ्रोबॅक फोटो सध्या व्हायरल होत आहे.



कोण आहे हा अभिनेता
या फोटोत अमिषा पटेल ज्या अभिनेत्यासोबत दिसत आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून हृतिक रोशन आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर ही माहिती दिली. कॅप्शनमध्ये अमिषा पटेलने लिहिलं आहे की, 'तुम्हाला दिलेल्या वचनानुसार मी थ्रोबॅक व्हिडिओ आणि फोटो शेअर करेन... हृतिक रोशनसोबतचा दुर्मिळ फोटो. हृतिक रोशन आणि माझ्या कुटुंबीयांनी माझ्या घरी 'कहो ना प्यार है'चं शूटिंग सुरू करण्यापूर्वी पार्टी केली होती. . या पिक्चरच्या काही दिवसांनंतर आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच व्हायरल होत आहे.