अमिषा पटेलची थेट संजय राऊतांना `जादू की झप्पी`; कुठे आणि कशी? वाचा
आमिषाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.
मुंबई : प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. याचबरोबर या कार्यक्रमाला सलमान खान, रितेश देशमुख, अमिषा पटेल यांच्यासोबतच शिवसेनेचे अनेक प्रमुख नेतेही उपस्थित होते. याचबरोबर खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली होती. सध्या सगळीकडे प्रसाद ओकच्या धर्मवीर सिनेमाची चर्चा सुरु असताना. एक व्हडिओही चर्चेचा विषय ठरला आहे.
हा व्हिडिओ आहे संजय राऊत आणि अमिषा पटेल यांच्या भेटीचा. स्वतः अमिषाने या ट्रेलर लाँच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती व्यासपीठावर जाताना तिला संजय राऊत दिसतात. यानंतर ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना 'जादू की झप्पी' देते.
यानंतर राऊतही तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. काही क्षण त्यांच्याशी बोलून ती पुढे निघते .१३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात आनंद दिघे यांचा आयुष्यपट मांडण्यात आलाा आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली असून झी स्टुडियोज आणि साहिल मोशन आर्ट्सने सिनेमाची निर्मिती केली आहे. आमिषाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. या व्हिडिओत तिने संजय यांनाही टॅग केलं आहे.