मुंबई : ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमराम हाशमी लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अमिताभ बच्चन आणि इमराम हाशमी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर स्क्रिन शेअर करणार आहेत. रूमी जाफरी दिग्दर्शित एका सायकोलॉजिकल थ्रिलरमधून दोघे एकत्र काम करणार आहेत. आनंद पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माते आनंद पंडित यांनी 'अमिताभ बच्चन यांच्यासोबत गेल्या दोन दशकांपासूनची जुनी मैत्री आहे. आतापर्यंत मी अशा एकाही कलाकाराला भेटलो नाही जो त्यांच्यासारखं कामासाठी इतकं समर्पण देऊ शकेल. माझ्यासाठी ही अतिशय सन्मानाची गोष्ट आहे की मला एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. चित्रपटाच्या कथेनुसार अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी त्यांच्या अभिनय कौशल्याने चांगलं यश मिळवून देतील' असं म्हटलं आहे. 



या चित्रपटात काम करण्याविषयी बिग बीनींही ट्विट केलं आहे. 'अनेक दिवसांपूर्वी केला गेलेला संकल्प आता पूर्ण होणार आहे...अखेर आनंद पंडित निर्मित, रूमी जाफरी दिग्दर्शित चित्रपटात इमरान हाशमीसोबत काम करण्याची संधी मिळणार असून चित्रपट २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होईल.' असं ट्विट केलं आहे. 



बिग बी आणि इमरान हाशमी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. बिग बी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बदला' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी तमिळ आणि हिंदीमध्ये सुरू असलेल्या 'उयान्थ्रा मनिथन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटातील बिग बींच्या लूकची मोठी चर्चा होत आहे.