अखेर Amitabh Bachchan आणि Rekha यांच्यातलं `ते` सत्य आलं समोर; जाणून बसेल तुम्हालाही धक्का
Amitabh Bachchan आणि Rekha यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांना माहित होते.
Amitabh Bachchan Rekha Movies: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांच्या लव्ह स्टोरी विषयी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहित आहे. त्या दोघांमध्ये ऑनस्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिन असणारी केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अमिताभ आणि रेखा या दोघांनी सगळ्यात आधी 1976 साली प्रदर्शित झालेल्या 'दो अंजाने' (Do anjaane) या चित्रपटात एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. मात्र, ही पहिली वेळ नव्हती जेव्हा त्या दोघांनी एकत्र काम केले. त्या आधी अमिताभ आणि रेखा यांनी 1972 मध्ये एकत्र पहिला चित्रपट साईन केला होता जो कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.
बीबीसीनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी 1972 साली सगळ्यात आधी प्रोड्यूसर जीएम रोशन आणि दिग्दर्शक कुंदन कुमार यांच्या 'अपने-पराये' (Apne Parae) या चित्रपटात साइन केलं होतं. या चित्रपटातील बऱ्याच सीनचे चित्रीकरण देखील झाले होते. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण खूप आरामात सुरु होते कारण निर्मात्यांकडे इतके पैसे नव्हते. मात्र, जसा जसा वेळ जात होतो तसं तसं अमिताभ आणि रेखा यांच्या विषयी चर्चा सुरु झाल्या.
रेखा आणि अमिताभ यांना अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये एकत्र कास्ट देखील केले. वेळ आणि पैशाच्या कमीमुळे 'अपने-पराये' च्या जागी 'दुनिया का मेला' हा चित्रपट आला. हा चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'अपने-पराये' चे शूटिंग सुरु झाल्यानंतर अमिताभ आणि रेखा यांनी 'दो अंजाने' चित्रपट केला. तर 'सिलसिला' हा त्या दोघांचा शेवटचा चित्रपट ठरला होता. 'सिलसिला' नं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण चित्रपटात दाखवण्यात आलेल्या लव्ह ट्रँगलमुळे चित्रपट चांगलाच चर्चेत होता. या चित्रपटात रेखा, अमिताभ आणि जया बच्चन (Jaya Bachchan) होते. 'सिलसिला'नंतर अमिताभ आणि रेखा कधीही एकत्र दिसले नाहीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया यांनी अमिताभ यांना रेखासोबत कोणत्याही चित्रपटात काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे रेखा आपलं पाऊल मागे घेण्यास तयार नव्हत्या. त्यांच्याशी संबंधित एक किस्सा देखील आहे. जेव्हा 'कुली' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक मोठा अपघात झाला आणि त्यांना बराच काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात राहावं लागलं. बच्चन कुटुंबासाठी तो काळ खूप कठीण होता. त्यादरम्यान, बिग बींचे ओळखीचे आणि मित्र त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा यांनाही अमिताभ बच्चन यांना भेटायचं होतं. त्याचबरोबर जया यांनी अमिताभ यांच्या खोलीजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावली होती. पण रेखा यांनी हार मानली नाही. पांढरी साडी नेसून, हातात फुलांची टोपली घेऊन फुलवाली बनून त्या सकाळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. त्यावेळी रेखा यांना कोणालाच ओळखता आलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने अमिताभ यांना दुरून पाहिलं आणि तिथूनच त्या परतल्या. नंतर जया यांना ही खबर मिळाली.