मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हे दोन अभिनेते सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. सध्या शारुहख खानचे एक पोस्ट भलतेच व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुखने अमिताभ बच्चनसोबत बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे. शाहरुखच्या या पोस्टला बिग बींना त्यांच्या अंदाजात उत्तर देत, तू माझे काही करु शकत नाही असे ट्विट केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 
शाहरुख खानने ट्विटरवर अमिताभ बच्चन यांना टॅग करत, माझा बदला घोण्यासाठी आलो आहे अमिताभ बच्चन साहेब तयार राहा... असं म्हटलंय. त्यावर  बिग बींनी रीट्विट करत किंग खानला उत्तर दिले, बदला घेण्याची वेळ निघून गेली... आता सगळ्यांचा बदला देण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी म्हटलं.


 



अशा तूतू-मैंमैं नंतर अभिनेत्री तापसी पन्नूने दोन्ही अभिनेत्यांना टॅग करत एक ट्विट केले, 'शाहरूख तुम्ही चुकीची गोष्ट मागीतली आहे... आता तर सिनेमा तयार झाला आहे, जर काही हवे असेल तर हे घ्या 'बदला' सिनेमाचा पहिलं पोस्टर...' बच्चन सर पोस्टरमध्ये खूप  कमाल दिसत आहेत. सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.
 
तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांनी सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित केलंय. सिनेमाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. 'बदला' सिनेमा 8 मार्च रोजी सिनेमा घरात दाखल होणार आहे. याआधी अमिताभ आणि तापसी 'पिंक' सिनेमात एकत्र झळकले होते.