पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान येणार एकत्र; `या` चित्रपटाच्या तयारीला सुरुवात
Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा येणार एकत्र...
Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे बरेच चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यात असे दोन चित्रपट आहेत ज्यांनी त्यांच्या छोट्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आता हे कोणते चित्रपट याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर हे चित्रपट आहेत 'भूतनाथ' आणि 'भूतनाथ 2'. दरम्यान, आता अशी माहिती समोर आली आहे की त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा 'भूतनाथ 3' मध्ये येणार असल्यानं चर्चा रंगल्या आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिसरा भागावर काम सुरु आहे. या चित्रपटात देखील अमिताभ बच्चन हे भूत होऊन दिसणार आहेत. इतकंच नाही तर 2025 मध्ये या चित्रपटावर काम सुरु होणार आहे आणि 2026 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पिंकविला' च्या सोर्सेसनुसर, चित्रपटासाठी कलाकारांची कास्टिंग आता सुरु झाली आहे. पण निर्मात्यांना आशा आहे की अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र येणार घेऊन येऊ शकतात. शाहरुख खानचा पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात पाहुण्या कलाकाराची भूमिका होती आता तिसऱ्या भागात या चित्रपटात काही वेगळं पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सध्या निर्मत्यांचा सगळं लक्ष हे स्क्रिप्टकडे लागलं आहे. त्यानंतर ते कास्टिंगकडे लक्ष देणार आहेत.
दरम्यान, सुत्रांनुसार, भूतनात फ्रेंचायझीला इतर हॉरर चित्रपटांपासून वेगळं करण्यासाठी भूतनाथ मध्ये असलेलं भूत हे चांगल आणि थोडक्यात एक चांगल्या व्यक्तीचं असल्याचं दाखवण्यात आलं. ही एक अशी फ्रेंचायझी आहे, ज्यातलं भूत सगळ्यांना आणि त्यातल्या त्याल लहाण मुलांना खूप आवडलं.
हेही वाचा : पहिल्यांदाच दिसली दीपिका आणि रणवीरच्या लेकीची झलक, VIDEO समोर
2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'भूतनाथ' या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक शर्मा यांनी केलं होतं. तर शाहरुख खानची यात पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. जूही चावला, राजपाल यादव आणि अमन सिद्दीकी या चित्रपटात दिसली. त्यानंतर 2014 मध्ये 'भूतनाथ रिटर्न्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अमिताभ बच्चन होते आणि या चित्रपटात शाहरुख खान रणबीर कपूर आणि अनुराग कश्यप हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले.