नवी दिल्ली : सुपरस्टार अमिताभ बच्चनने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ७० कोटी रूपये इनकम टॅक्स जमा केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये या वर्षात कोणत्याही कलाकाराकडून सर्वाधिक भरला गेलेला कर असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बींनी मुजफ्फरपुरमधील २०८४ शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षात बिग बी यांच्या 'बदला' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. 'बदला'मधील बिग बींच्या भूमिकेलाही चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तसेच याच वर्षात 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी लवकरच रूमी जाफरी दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलरमधून दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित यांनी केली आहे. आनंद पंडित यांनी 'बिग बींसोबत माझी गेल्या दोन दशकांपासूनची मैत्री आहे. आतापर्यंत मी अशा एकाही कलाकाराला भेटलो नाही जो त्यांच्यासारखं कामासाठी इतकं समर्पण देऊ शकेल. आमच्या चित्रपटाच्या कथेनुसार बिग बी आणि इमरान हाशमी यांचा अभिनय चित्रपटाला यश मिळवून देईल' असं पंडित यांनी म्हटलं आहे.