Amitabh Bachchan : कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला चित्रपट हा खास असतो. पण जर एकामागे एक चित्रपट फ्लॉप होऊ लागले तर करिअरमध्ये खूप अडचणी निर्माण होतात. असा एक कलाकार आहे ज्यानं करिअरच्या सुरुवातीला एकामागे एक असे 12 फ्लॉप चित्रपट दिले. तरी सुद्धा त्यांनी हिम्मत हारली नाही आणि 'जंजीर' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिं नाही. पण 1987 मध्ये अशा एका स्कॅममध्ये अडकले की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तब्बल 25 वर्ष लागली. भारताचे पहिले सगळ्यात चर्चेत असलेला इंटरनॅशनल घोटाळ्यात अडकलेल्या या अभिनेत्यानं त्यांचं करिअर, प्रॉपर्टी आणि जवळपास सगळं काही गमावलं होतं. हे सगळं काही आपण जे बोलतोय ते अमिताभ यांच्याविषयी आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय घडलं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांना 2016 मध्ये या स्कॅममधून सूटका मिळाली होती. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणाविषयी खुलासा केला होता आणि इतकंच नाही तर अमिताभ यांनी त्यांच्या पदावरून राजीणामा देखील दिला होता. आता हा स्कॅम कोणता होता? 1986 मध्ये भारत सरकार आणि शस्त्र निर्मिती करणा स्वीडिश कंपनी एबी बोफोर्समध्ये 1437 कोटी रुपयांचा करार झाला होता. याअंतर्गत स्वीडिश कंपनी भारताला 155 मिमीच्या 400 हॉवित्झर तोफांचा पुरवठा करणार होती.



एप्रिल 1987 मध्ये एका स्वीडिश रेडियोनं दावा केला होता की भारताच्या सगळ्यात मोठ्या नेत्याचे आणि रक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 60 कोटींची घूस घेतल्याचे सांगितले. राजीव गांधी हे त्यावेळी पंतप्रधान होते आणि कॉंग्रेसची सरकार होती. अमिताभ हे कॉंग्रेस मंत्री असून अलाहाबादचे लोकसभा खासदार होते. या सगळ्या घोटाळ्यात अमिताभ बच्चन यांचं नाव देखील समोर आलं होतं. राजीव गांधी हे अमिताभ यांचे मित्र होते. घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जुलै 1987 मध्ये राजीनामा दिला. बोफोर्समध्ये अडकल्यानंतर अमिताभ यांचं करिअर खराब होऊ लागलं. अमिताभ सतत बोलत होते की त्यांनी अडकवण्यात आलं आहे. त्यानंतर अमिताभ यांना चित्रपट मिळत नव्हते. 90 चं दशक सुरु झालं होतं आणि अजय देवगण, अक्षय कुमार, शाहरुख खान सारख्या कलाकारांची लोकप्रियता वाढत होती. तर दुसरीकडे अमिताभ यांच्यावर खूप कर्ज झालं होतं. त्यांच्या अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रोडक्शन हाउसला खूप मोठं नुकसान झालं होतं.


2012 मध्ये बोफोर्स केस प्रकरणात स्वीडिश व्हिसब्लोवर स्टेन लिंड्स्टॉर्म जे माजी स्वीडिश पोलिस चीफ होते, त्यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. कोर्टानं अमिताभ यांना क्लीन चिट दिली. तर 2016 मध्ये अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या प्रकरणात त्यांना 25 वर्ष दु:खं झाल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं की जेव्हा माझं कुटुंब आणि माझ्या बोफोर्स घोटाळ्याचे आरोप लगावण्यात आले होते तेव्हा त्यांनी माझ्या अस्तित्वाच्या सगळ्या क्षणांना काळ्या रंगात रंगून सोडलं होतं. 


अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की "25 वर्षांनंतर  सरकारी वकिलांनी सत्य काय आहे ते सगळ्यांसमोर आणलं की बच्चन कुटुंबाचं नाव काही नसताना घेण्यात आलं!! 25 वर्षांनंतर...!! जेव्हा त्याचा खुलासा झाला तेव्हा त्यांनी यावर माझी प्रतिक्रिया विचारतात! मी कशी प्रतिक्रिया द्यावी… मी काय बोलू… कोणाला सांगू… ते 25 वर्षांचे दु:ख पुसून टाकू शकतील का… बदनामीचा डाग हलका करू शकतील का…"