मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती लाखोंना विकला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांचा हा निळा हत्ती मुंबईतील एलिफंट परेडच्या लिलावात बोली दरम्यान 10 लाखांना विकला गेला. हत्तींच्या या मुर्त्यांचं प्रदर्शन रॅली गेटवे ऑफ इंडियापासून सुरु होऊन पार्क, वर्ली सी फेस, बांद्रा फोर्ट भागातून गेली आणि लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरला.



लुप्त होत चाललेल्या हत्तींच्या जातींच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या एलिफंट फॅमिलीच्या सदस्यांनी म्हटलं की, अमिताभ बच्चन यांना आग्रह करण्यात आला होता की, 101 हत्तींमध्ये एक हत्ती अमिताभ यांचा देखील असावा. चित्रकाराने या हत्तीची पेंटिंग त्यांच्या आवडीनुसार करावी. बिग बी यांनी यासाठी निळा रंग निवडला. फुल आणि पानांनी याला सजवलं गेलं. या हत्तीवर हरीवंश राय यांची कविता लिहण्यासाठी देखील अमिताभ यांनी सांगितलं होतं. जी त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली होती.